बारसू रिफायनरीचा प्रकल्प जैतापूरला का नेत नाही? राज ठाकरेंच्या प्रश्नाला सामंतांचे उत्तर, म्हणाले...

बारसू रिफायनरीचा प्रकल्प जैतापूरला का नेत नाही? राज ठाकरेंच्या प्रश्नाला सामंतांचे उत्तर, म्हणाले...

बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राज ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला थेट प्रश्न विचारला होता. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले आहे.
Published on

निसार शेख | चिपळूण : कोकणातील बहुचर्चित प्रकल्प म्हणून ओळखला जात असलेल्या रिफायनरी प्रकल्पामध्ये कातळशिल्पे जात असल्याचा उल्लेख मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीतील सभेत केला होता. तसेच, तो प्रकल्प जैतापूर येथे का नेण्यात येत नाही, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले असून रिफायनरी बारसू येथेच होईल याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत.

बारसू रिफायनरीचा प्रकल्प जैतापूरला का नेत नाही? राज ठाकरेंच्या प्रश्नाला सामंतांचे उत्तर, म्हणाले...
RBI withdraws 2000 note: काळा पैसा जमा करून ठेवला असेल तर...; फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर

काय म्हणाले होते राज ठाकरे?

रिफायनरी प्रकल्पामध्ये कातळशिल्पे जात आहेत. कोकणात हजारो एकर जमिनी कोकणवासियांना फसवून विकत घेतल्या जात आहेत. दलाल, अधिकारी यांच्या संगनमताने जमिनी गिळल्या जात आहेत. जैतापूरचा प्रकल्पाचं काय झालं? काहीच नाही. ती कंपनी बुडाली. तिथे जमीन विकत घेतलेली आहेच मग तिथे का नाही नेत तो प्रकल्प, असा प्रश्न राज ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला होता.

यावर उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना उत्तर दिले आहे. रिफायनरीमध्ये एकही कातळशिल्पे असणारी जमीन घेतली जाणार नसल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, राज ठाकरे यांचे जे गैरसमज असतील ते दूर केले जातील, असेही त्यांनी म्हंटले. याशिवाय रिफायनरी बारसू येथेच होईल याबाबत स्पष्ट संकेत सामंतांनी दिले आहेत.

दरम्यान, कोकणातील रिफायनरीला स्थानिक विरोध करत आहेत. याविरोधात आंदोलन सुरु असताना ग्रामस्थ आणि पोलीस आमने-सामने आले असता पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक जण जखमी झाले होते. यावरुन राज्यातील राजकीय वातावरणही मोठ्या प्रमाणात तापले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com