उदय सामंत यांचं मंत्रीमंडळ विस्तारावर सूचक विधान म्हणाले...
अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना साथ देत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला. उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवारांनी घेतली. याच पार्श्वभूमीवर शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अनेक प्रतिक्रिया देखिल येत आहे. यातच अजून खातंवाटप आणि मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही आहे.
याच पार्श्वभूमीवर आता उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. उदय सामंत म्हणाले की, बच्चू कडूंनी आत्तापर्यंत सहकार्य केलं आहे. बच्चू कडू माझे ज्येष्ठ सहकारी आहेत. अनेकांना न्याय मिळालेला नाही. आमच्या ४० आमदारांपैकीही इच्छुकांना न्याय मिळालेला नाही. बच्चू कडूंचा गैरसमज होणार नाही याची मला पूर्ण खात्री असं उदय सामंत म्हणाले.
तसेच अर्थखातं कुणाला देऊ नये वगैरे सांगण्याएवढे आम्ही मोठे नाहीत. ज्यावेळी मंत्रीमंडळ विस्तार होईल, तेव्हा एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील. कोणतीही वाईट वागणूक आम्हाला मिळत नाही. असे उदय सामंत म्हणाले.