Dombivli police | Shiv Sena
Dombivli police | Shiv Senateam lokshahi

डोंबिवली शहर शाखेत दोन गट भिडले, पोलिसांचा मध्यस्थीचा प्रयत्न सुरू

शाखेत दोन्ही गट आमने-सामने आल्याने राडा
Published by :
Team Lokshahi
Published on

(अमझद खान) कल्याण - डोंबिवली शिवसेनेच्या शहर शाखेत फोटो लावण्यावरुन शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थक एकमेकांमध्ये भिडले. दोघांनी शाखेवर ताबा असल्याचा दावा करत शाखेत ठाण मांडले आहे. राज्याचे राजकारण तापले असता एकीकडे शिवसेना कोणाची आहे. दोन्ही गटाकांडून शिवसेना दावा केला जात आहे. दुसरीकडे शाखा ताब्यात घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरु आहेत. डोंबिवली शहर शाखेत त्याचा आज प्रत्यय आला. या शाखेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो होतो. (Two groups clashed in Dombivli Shiv Sena's city branch, police trying to mediate)

Dombivli police | Shiv Sena
Govt job 2022 : IBPS PO भरती अधिसूचना जारी, बँकांमध्ये 6000 हून अधिक रिक्त जागा

काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे समर्थकांनी मुख्यमंत्री शिंदे व खासदार शिंदे यांचा फोटो काढला होता. आज दुपारी शाखेत उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना शहर प्रमुख विवेक खामकर आणि अन्य पदाधिकारी बसलेले असताना शिंदे गटातील काही कार्यकर्ते शाखेत आले. शाखेत दोन्ही गट आमने-सामने आल्याने त्यांच्या जोरदार वाद झाला.

Dombivli police | Shiv Sena
​Passport Office Jobs : पासपोर्ट कार्यालयात नोकरीची संधी, 7 ऑगस्टपूर्वी करा अर्ज

शिंदे गटातील कार्यकत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार शिंदे यांचा फोटो लावला. गेल्या दोन तासापासून या मुद्यावरुन सुरु आहे. दोन्ही गटातील कार्यकर्ते ज्या मध्ये महिलांची संख्या जास्त आहे. त्यांनी शाखेत ठाण मांडले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शाखेत धाव घेतली आहे. दोन्ही गटामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरु केला आहे. शिवसेनेचे सदानंद थरवळ आणि कविता गावंड या देखील शाखेत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com