‘…आता भगव्याची जबाबदारी आमची,’ नितेश राणेंचं सूचक ट्विट
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून (ED) अटक (Arrested) करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) मनी लॉड्रिंग प्रकरणी (Money laundering case) नबाब मलिकांची चौकशी करण्यासाठी मलिकांना ताब्यात घेतलं आहे. याचपार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी म्हणून.. आता भगव्याची जबाबदारी आमची!!! असं सूचक ट्विट राणेंनी केले आहे.
शिवसेनेचे हिंदूत्व आता पहिल्यासारखे राहिले नाही, शिवसेनेचे हिंदूत्व आता बेगडी हिंदूत्व झाले आहे, अशी टीका सतत भाजपकडून करण्यात येत आहे. आता भगव्याची जबाबदारी आता फक्त आमची आहे. बाकीचे काय करत आहेत हे तुम्ही पाहत आहात, असे म्हणत महाआघाडी सरकारवर पुन्हा हल्लाबोल करण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्री म्हणून राहण्याचा नवाब मालिकांना कोणताही नैतिक आणि कायदेशीर अधिकार नाही. त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे, असा इशारा भाजपने काल दिला आहे. यामुळे ९३ च्या दंगली नंतर मुंबई मा.बाळासाहेबांनी वाचवली..आज त्यांचाच मुलगा मुख्यमंत्री असताना ९३ च्या दंगलीतील आरोपींना वाचवत आहे. असे सूचक ट्विट राणेंनी केले आहे.
महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडी (ED) भाजपच्या इशाऱ्यावरून कारवाई करत आहे, असा आरोप गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत सतत करत आहेत. महाविकास आघाडीनेही हीच भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच खुद्द मुख्यमंत्र्यांनी सुडाचे राजकारण सुरू आहे, म्हणत भाजपवर टीका करण्यात येत आहे. अशातच मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या ईडी चौकशीने राजकारण तापवले आहे. यावर दोन्ही बाजुने आता जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे.