राजकीय तमाशा बंद करा; तृणमूल काँग्रेसचं गुवाहाटीतील हॉटेलबाहेर जोरदार आंदोलन
आसाम : एकनाथ शिंदे यांनी आपले बस्तान सूरतमधून गुवाहटीत हलवले आहे. यामुळे गुवाहटी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रस्थान बनले आहे. परंतु, याविरोधात आता तृणमूल काँग्रेसने आंदोलन केले असून राजकीय तमाशा बंद करा, स्थानिक मुद्द्याकडे लक्ष द्या, अशी मागणी केली आहे. दरम्यान, यावेळी पोलिसांनी आंदोनकर्त्यांची धरपकड केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार सध्या गुवाहटीतील ब्लू रेडिसन्स हॉटेलमध्ये थांबले आहे. यामुळे गुवाहटी राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे. अनेक शिवसेनेचे आमदार याठिकाणी दाखल होत आहे. परंतु, राज्याच्या राजकारणात सामान्या माणूस भरडला जात असून याविरोधात तृणमूल काँग्रेसचं रेडिसन्स हॉटेलबाहेर जोरदार आंदोलन केले आहे. राजकीय तमाशा बंद करा, स्थानिक मुद्द्याकडे लक्ष द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
आसाममध्ये पूरस्थिती असून परिस्थिती बिघडत आहे. मात्र, भाजप राजकारणात करण्यात मश्गुल असल्याची टीकाही तृणमूल काँग्रेसने केली आहे. तर, हे सर्व राजकारण महाराष्ट्रात जाऊन करा, असेही टीएमसीच्या नेत्यांनी म्हंटले आहे. तर, टीएमसीकडून आंदोलनावेळी गोंधळ वाढल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे.