Accident
AccidentTeam Lokshahi

Accident : भरधाव ट्रॅव्हल्स पलटली, बसमध्ये होते 22 प्रवासी

ट्रॅव्हल्स 15 ते 20 फूट गेली फरफटत
Published on

प्रशांत जगताप | सातारा : पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळ 22 प्रवासी घेऊन निघालेली ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने भीषण अपघात झाला आहे. आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये 22 पैकी 8 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत

Accident
शाळा पुन्हा बंद? Varsha Gaikwad म्हणाल्या...

मुंबईहून कोल्हापूरला प्रवासी घेऊन निघालेली ट्रॅव्हल्स (एमएच-09- ईएम- 4876) चा गोटे गावच्या हद्दीत अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने गाडी डिव्हायडरला धडकली व ट्रॅव्हल्स 15 ते 20 फूट फरफटत गेली होती. ट्रॅव्हल्स पलटी झाल्याचा मोठा आवाज आल्याने पहाटे लोकांची मोठी धावपळ उडाली.

ट्रॅव्हल्समधील 22 पैकी 8 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. यामध्ये विराज विठ्ठल शिंदे (वय 24, रा. चिपळूण), दिलीप रतोबा जाधव (वय 64, रा. कोल्हापूर), संजय श्रीमंत भोसले (वय 42), सचिन श्रीमंत भोसले (वय 37, दोघेही रा. सानपाडा), गजेंद्र मारूती भिसेल (वय- 35, रा. कोल्हापूर), तुकाराम महादेव पाटील (वय- 48, रा. मानखुर्द), अन्सारी असउद्दीन इल्लास (वय- 25, रा. नांदेड) तर अन्य एकजण अशी जखमींची नावे आहेत.

Accident
पहिले प्यार का वादा...; गुलाबराव पाटलांनी सांगितली महविकास आघाडीची लव्हस्टोरी

कराडनजीक हायवेवर असलेल्या हॉटेल महेद्रा समोर हा अपघात झाला. यावेळी हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा, महेश होवाळ आणि कराड शहर पोलीस स्टेशनचे खालीक इनामदार, महामार्ग पोलीस स्टेशनचे लोखंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना कराड शहरात उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. तसेच, महामार्गावर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली आहे.

Accident
चिंताजनक! लसीकरण होऊनही 'इतक्या' टक्के रुग्णांना कोरोना
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com