Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची तोफ आज ठाण्यात धडाडणार

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची तोफ आज ठाण्यात धडाडणार

उद्धव ठाकरे यांची तोफ आज ठाण्यात धडाडणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

उद्धव ठाकरे यांची तोफ आज ठाण्यात धडाडणार आहे. ठाकरे गटाचा आज ठाण्यात मेळावा पार पडणार आहे. हा ठाकरे गटाचा मेळावा गडकरी रंगायतन येथे होणार आहे. संभाजीनगर आणि पुण्यातील शिवसंकल्प अभियानानंतर आता उद्धव ठाकरे यांची तोफ आज ठाण्यात धडाडणार आहे.

या मेळाव्यातून उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार असून या मेळाव्यासाठी युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हेसुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून उद्धव ठाकरे या मेळाव्यातून काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com