Sunil Raut | Devendra Fadnavis | Sanjay Raut
Sunil Raut | Devendra Fadnavis | Sanjay Raut Team Lokshahi

राऊतांना धमकी; फडणवीस म्हणाले, धमकी देणारा दारूच्या नशेत, सुनील राऊतांनी दिले जोरदार प्रत्युत्तर

श्रीकांत शिंदे यांचे कारचालक आणि भाजी आणणाऱ्या लोकांनाही सुरक्षा पुरविण्यात आली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुरक्षा देणे महाराष्ट्र सरकारला परवडत नसेल. सुनील राऊतांची सरकारवर टीकाय
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच आज दुसरीकडे शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच वातावरण तापले आहे. ‘दिल्ली में मिल, तुझे एके-47 से उडा देंगे, सिद्धू मुसेवाला टाइप,’ असा धमकीचा मेसेज संजय राऊत यांना आला आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं ही धमकी मिळाली असल्याचं समोर आले आहे. त्यानंतर कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आमदार सुनील राऊत यांनी दिली. यावेळी त्यांनी माध्यांमाशी संवाद साधला.

Sunil Raut | Devendra Fadnavis | Sanjay Raut
संजय राऊत धमकी प्रकरणी लॅारेन्स बिश्नोईवर गुन्हा दाखल

नेमकं काय म्हणाले सुनील राऊत?

राऊतांना धमकी मिळाल्यानंतर यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ भाष्य केले. संजय राऊत यांना धमकी देणारा दारूच्या नशेत होता, अशी माहिती त्यांनी दिली होती. फडणवीसांच्या याविधानावर माध्यमांशी बोलताना सुनील राऊत म्हणाले की, “दारूच्या नशेत संजय राऊत यांचा मोबाइल नंबर कसा मिळाला? महाराष्ट्रात भरपूर लोक आणि नेते आहेत. मग त्याने संजय राऊत यांनाच धमकी का दिली? सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणाचे सूत्रधार पुण्यात सापडले होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ही गोष्टी गंभीररीत्या घेत प्रामाणिक कारवाई करावी.” अशी मागणी सुनील राऊत यांनी यावेळी केली.

पुढे ते म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांपासून संजय राऊत यांना धमकीचे फोन येत आहेत. सातत्याने तक्रार करूनही महाराष्ट्र सरकारने स्टंटबाजी म्हणून त्याकडे लक्ष दिले नाही. सरकार आम्हाला सुरक्षा देईल, अशी अपेक्षा आम्ही ठेवत नाही. पण, सुरक्षा मिळाली नाही तरीही संजय राऊत किंवा आम्ही शिवसेनेचे काम ठामपणे करत राहू. सरकारने ४० गद्दार आमदारांसाठी पोलिसांच्या दोन-दोन गाड्या ठेवल्या आहेत. श्रीकांत शिंदे यांचे कारचालक आणि भाजी आणणाऱ्या लोकांनाही सुरक्षा पुरविण्यात आली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुरक्षा देणे महाराष्ट्र सरकारला परवडत नसेल, अशी जोरदार टीका सुनील राऊत यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com