इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत ठरले 'हे' 3 मोठे ठराव
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडी जोरदार तयारी करण्यात येत आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते मुंबईत आले आहेत. ग्रँड हयातमध्ये या सर्वांची बैठक पार पडली. 28 पक्षांचे नेते या बैठकीसाठी मुंबईत जमले आहेत.
या बैठकीत या बैठकीत तीन मोठे ठराव करण्यात आले आहेत. या बैठकीत इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. यात 13 जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये शरद पवार, संजय राऊत, केसी वेणूगोपाल, एम के स्टॅलिन, तेजस्वी यादव, अभिषेक बॅनर्जी, राघव चड्डा, मेहबूबा मुफ्ती, डी राजा, ओमर अब्दुला यांच्या समावेश, जावेद खान, ललन सिंग, हेमंत सोरेन यांचा या समितीत समावेश आहे.
3 ठराव कोणते?
आम्ही इंडिया आघाडीतील सर्व पक्ष देशातील वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी एकत्रितपणे सार्वजनिक रॅली आयोजित करण्याचा संकल्प करतो.
इंडिया आघाडीतील सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणुका एकत्र लढण्याचा संकल्प करतो. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागा वाटपाची व्यवस्था सुरू केली जाईल. लवकर जागा वाटपाची ही प्रक्रिया पूर्ण होईल.
आम्ही इंडिया आघाडीतील सर्व पक्ष विविध भाषांमध्ये ‘जितेगा भारत’ या थीमसह मोहिमांमध्ये समन्वय साधण्याचा संकल्प करतो.