अरविंद केजरीवालांना दिलासा नाहीच; अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत वाढ

अरविंद केजरीवालांना दिलासा नाहीच; अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत वाढ

केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 15 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चला अटक करण्यात आली. ईडी कोठडीनंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. आता अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत आणखी काही दिवसांची वाढ करण्यात आली असून 15 एप्रिलपर्यंत म्हणजेच आणखी 15 दिवस ईडी कोठडीत राहणार आहेत.

मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. अरविंद केजरीवाल यांच्या अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी आज संपत होती.

आज न्यायालय काय निर्णय देईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. रविवारी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात सर्व विरोधी पक्षांनी नवी दिल्लीच्या रामलीला मैदानवर मोठी सभा घेतली होती. त्यातच आता अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 15 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com