राजकारण
Manipur Violence : लोकसभेत विरोधकांनी मांडला मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव
मणिपूरच्या मुद्द्यावरुन लोकसभेत विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला आहे.
मणिपूरच्या मुद्द्यावरुन लोकसभेत विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला आहे. संसदेचे अधिवेशन सुरु झाले आहे. विरोधक काही दिवसांपासून आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. मणिपूरमध्ये जे घडलं त्यावर मोदींनी दोन्हीही सभागृहात निवेदन मांडावे अशी भूमिका विरोधकांकडून घेण्यात आली होती. यावर आज विरोधकांची बैठक पार पडली.
मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर सध्या संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरू आहे. मणिपूर हिंसाचारावर आता काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर संसदेमध्ये भाष्य करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळाटाळ करत असल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. सरकारविरोधात अविश्वास ठराव दाखल केला असला तरीदेखिल मोदी सरकारकडे पूर्ण बहुमत आहे.