कोश्यारींच्या जागी नवीन राज्यपाल कोण? 'ही' नावे आहेत शर्यतीत
मुंबई : भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मला मुक्तता द्यावी, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. यामुळे सध्या दिल्ली दरबारी राज्यपाल बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी तीन नावे राज्यपाल पदांच्या शर्यतीत आहेत.
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या जागी नव्या राज्यपालाची नेमणूक करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमिंदर सिंग आणि माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन याचबरोबर राजस्थानचे माजी प्रदेशाध्यक्ष ओम माथुर, यांच्या नावाची चर्चा आहे. सुमित्रा महाजन यांचे नाव राज्यपाल पदासाठी आघाडीवर समजत आहे. 2014 ते 2019 या काळात लोकसभेचे अध्यक्ष पद भूषविल्यामुळे प्रदीर्घ घटनात्मक विषयाचा अभ्यास त्यांना आहे. त्याचबरोबर त्यांचा जन्म महाराष्ट्रातील चिपळूणचा आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व आणि चांगल्या महिला राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे.