राजकारण
मोठी बातमी! दिल्ली सेवा विधेयकाचं अखेर कायद्यात रुपांतर; राष्ट्रपतींकडून मिळाली मंजुरी
दिल्ली सर्व्हिस बिलाचं कायद्यात रुपांतर झालं आहे.
दिल्ली सर्व्हिस बिलाचं कायद्यात रुपांतर झालं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकाला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने हे विधेयक मंजुर केले होते. आता त्याला राष्ट्रपतींकडूनही मान्यता मिळाली आहे. अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का मानला जातो.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या विधेयकाला विरोध केला होता. राष्ट्रपतींनी आज सही करत या विधेयकाचे कायद्यात रूपांतरण केले. लोकसभा आणि राज्यसभेने मंजूरी दिल्यानंतर विधेयक राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडे पाठवले होते.