केंद्र सरकार ठरवून राज्यातील मंत्र्यांना टार्गेट करतेय – विजय वडेट्टीवार
नादेंड | अतिवृष्टीमुळे कसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील नुकसानीचा मोबदला येत्या दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, तसे नियोजन राज्य सरकारच्या वतीने सुरू आहे असे मत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकी दरम्यान प्रचाराच्या वेळी पत्रकारांशी बोलताना केले आहे.
ही मदत तोकडी आहे या चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपाविषयीच्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील कधी काय बोलतील, ते कधी हसत बोलतील , त्यांच्या हसण्यातील बोलण्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही ,अशी वडेट्टीवार यांनी कोपरखळी मारली.
तपास यंत्रणेचे,पुढचे लक्ष कोण असेल या चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील मंत्र्यांना ठरवून टार्गेट केले जात आहे , ही केंद्राची जी नीती आहे ती चुकीची आहे .
मुळात एनडीआरएफच्या निकषानुसार केंद्राने जी मदत दिली पाहिजे ती मुद्दामहून कमी केली जात असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी लोहगाव येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेनंतर पत्रकारांशी बोलताना आरोप केला आहे.