महाराष्ट्रात कर्नाटक भवन उभारण्याचा डाव ठाकरेंची शिवसेना उधळून लावणार

महाराष्ट्रात कर्नाटक भवन उभारण्याचा डाव ठाकरेंची शिवसेना उधळून लावणार

कोल्हापूरात कर्नाटक भवन उभारण्याची घोषणा नुकतीच केली होती. याला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने तीव्र विरोध केला
Published on

सतेज औंधकर | कोल्हापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरात कर्नाटक भवन उभारण्याची घोषणा नुकतीच केली होती. याला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने तीव्र विरोध केला असून महाराष्ट्रात कर्नाटक भवन उभारण्याचा डाव उधळून लावण्याचा निर्धार केला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कणेरी या ठिकाणी सिद्धगिरी मठाच्या परिसरात कर्नाटक भवन उभारण्याची घोषणा केली होती. यासाठी पाच कोटींचा निधीही देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. याविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला असून तीव्र विरोध केला आहे.

कोणत्याही परिस्थितीत कोल्हापुरातच नव्हे तर राज्यात कर्नाटक भवन उभे करण्यास विरोध केला आहे. तसेच, पहिले महाराष्ट्र भवन हे कर्नाटकात उभं करा, असा सल्ला देखील शिवसेनेच्या वतीने बोम्माईंना देण्यात आला आहे. जर कणेरी इथं कर्नाटक भवन उभारण्याचा प्रयत्न झाला तर मात्र तो उधळून लावण्याचा इशाराही ठाकरे गटाने दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com