राजकारण
ठाकरे कथित 19 बंगले प्रकरण: आजी-माजी ग्रामसेवक प्रशासनाच्या रडावर
कोर्लईतील आजी माजी ग्रामसेवक प्रशासनाच्या रडावर
मुंबई : मुरूड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायतीचे आजी माजी ग्रामसेवक, सरपंच सध्या प्रशासनाच्या रडारवर आहेत. कोर्लईच्या गावठाणाबाहेर 263 तर गावठाणात 63 बांधकामे करण्यात आली आहेत.
यात ग्रामपंचायतीने नियमबाह्य बांधकाम परवाने आणि दुरुस्ती परवाने दिले गेले. तसेच काही बांधकामांना कागदपत्रांची पूर्तता न करताच परवानगी दिली गेली. मिळकत नोंदवहीत नोंदी करताना अनेक त्रुटी समोर आल्या, असा ठपका ठेवत 8 माजी ग्रामसेवक आणि 5 माजी सरपंचांवर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
कोर्लईतील ग्रामसेवक आणि सरपंचांवर दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. ठाकरे कुटुंबियांच्या कथित 19 बंगले घोटाळा प्रकरणानंतर गावातील बांधकांमाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. त्या चौकशीदरम्यान ही बाब पुढे आली आहे.