राजकारण
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे सर्वोच्च न्यायालयात, 31 जुलैला सुनावणी
पक्षाचं नाव अन् चिन्हाबाबतच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे सर्वोच्च न्यायालयात
शिवसेना पक्ष आणि एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेलं शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण याविरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं दिला होता. हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी याचिका ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात केली होती.
सर्वोच्च न्यायालय 31 जुलै रोजी या प्रकरणावर सुनावणी करणार असल्याचं सरन्यायाधीशांनी सांगितलं आहे. आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 31 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.