उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का! माजी नगरसेवक शिंदे गटात करणार प्रवेश?

उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का! माजी नगरसेवक शिंदे गटात करणार प्रवेश?

शिंदे गटाच्या 16 आमदार अपात्रता प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे. अशातच, उध्दव ठाकरे यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
Published on

मुंबई : शिंदे गटाच्या 16 आमदार अपात्रता प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे. शिंदे आणि ठाकरे गटाकडून विजयाचा दावा केला जात आहे. अशातच, उध्दव ठाकरे यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का! माजी नगरसेवक शिंदे गटात करणार प्रवेश?
गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी! विसर्जनाच्या रात्री धावणार 10 विशेष लोकल; पाहा वेळापत्रक

राज्यभर उध्दव ठाकरेंकडून सभा घेत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा नाराजीचा सूर उमटला आहे. ठाकरे गटाचे तीन माजी नगरसेवक आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. नाराज माजी नगरसेवक आज संध्याकाळी शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे समजते. हे सर्व नगरसेवक मुंबईचे असल्याचे राजकीय सूत्रांची माहिती माहिती मिळत आहे.

दरम्यान, आमदार अपात्रतेप्रकरणी आतापर्यंत विधीमंडळात दोनदा सुनावणी पार पडली आहे. याचिका एकत्र करण्यावरुन आणि पुरावे सादर करण्यावरुन दोन गटांमध्ये मतभेद होते. त्यावर राहुल नार्वेकरांनी निकाल राखून ठेवला असून आता पुढची सुनावणी वेळापत्रक ठरवून 13 ऑक्टोबरला होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com