'...प्रसिद्धी मिळवणे बेशरमपणा' शीतल म्हत्रेंच्या आरोपांवर ठाकरे गटाचे जोरदार प्रत्युत्तर
राज्यात एकीकडे वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना दुसरीकडे आज गेल्या काही तासांपासून शिवसेनाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे या दोघांचा मॉर्फ केलेल्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र आता या व्हिडिओवरून राजकारण चांगलंच तापले आहे. या प्रकारानंतर नुकताच शीतल म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला. यावेळी हा व्हिडिओ ठाकरे गटाकडून व्हायरल केला गेला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यानंतर म्हात्रे यांच्या आरोपांवर ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे.
काय दिले खासदार चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर?
शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर केलेल्या आरोपांवरुन प्रत्युत्तर देतांना प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, ‘आमचं नाव घेऊन प्रसिद्धी मिळवणे बेशरमपणा आहे. त्यांना वाटते आमच्याकडे दुसरं काही काम नाही. त्यांनी स्वत:च नाव बदनाम केल आहे. ज्यांनी 50 खोके खाऊन काम करता, आम्ही त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमची कामं जनतेशी संबंधित आहेत. जनतेच्या कामाशी आमची बांधिलकी आहे. तसेच जर असा व्हिडीओ व्हायरल झाला असेल, तर त्यासाठी सायबर सेल आहे. सायबर सेल त्यांची जबाबदारील पार पाडेल. पण आरोप करणं, राजकारण करणं, तसेच प्रसिद्धीसाठी दुसऱ्यांवर आरोप करणं हा बेशरमपणा आहे.’ असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.