Kalyan
KalyanTeam Lokshahi

ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखास कल्याण पोलिसांकडून तडीपारीची नोटीस

नोटीसची सोशल मिडियावर चर्चा
Published by :
Sagar Pradhan
Published on

ठाकरे आणि शिंदे गटात सुरु असलेल्या वादात ठाकरे गटातील जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना तडीपारीची नोटीस कल्याण पोलिसांनी दिली आहे. या कारवाईला कायदेशीर उत्तर देणार अशी नोटीसवर प्रतिक्रिया साळवी यांनी दिली आहे. मात्र, नोटीसची चर्चा सोशल मिडियावर सुरु झाली आहे.

Kalyan
शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान मोदी जपानला रवाना

विजय उर्फ बंड्या साळवी हे काही दिवसापूर्वी चर्चेत आले होते. कारण होते त्यांच्या पक्ष निष्ठा गणपती देखाव्यास पोलिसांनी आक्षेप घेत देखावा जप्त केला होता. त्यानंतर न्यायालयात धाव घेऊन आक्षेपार्ह देखावा काढून पुन्हा हा देखावा परवानगी मिळविली होती. या देखाव्यावर विजय साळवी यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

Kalyan
कार्यालय स्वच्छ करणाऱ्या अधिकाऱ्यांना पारितोषिक देण्याऐजवी, शहर स्वच्छ करणाऱ्या अधिकाऱ्याला पारितोषिक द्या

आत्ता पोलिासंकडून साळवी यांना तडीपारीची नोटिस दिली गेली आहे. या नोटिसमध्ये त्यांना विचारणा केली आहे की, मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तुम्हा तडीपार का करण्यात येऊ नये. या संदर्भात त्यांना पोलिसांकडून उत्तर मागितले गेले आहे. विजय साळवी यांच्या विरोधात काही गुन्हे दाखल आहेत. या बाबत साळवी यांचे महणे आहे की, हे सर्व राजकीय गुन्हे आहे. अन्यायकारक या कारवाईस ते कायदेशीर उत्तर देणार आहे. मात्र या संदर्भात त्यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com