जळगावमधील सभेत शुभांगी पाटील गुलाबराव पाटलांवर बरसल्या; म्हणाल्या, पान टपरीवाला...
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर सभा होत आहे. परंतु, या सभेपूर्वी जळगावमधलं राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले. यावेळी शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप- प्रत्यारोप पाहायला मिळाले. ठाकरेंच्या या सभेला शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी या सभेला विरोध केला. सोबतच आम्ही दगड मारून सभा, आंदोलनं उधळून लावणारे लोक आहोत. असे गुलाबराव पाटील म्हणाले होते. त्यावरून हा वाद आणखीच उफाळून आला. पाटलांच्या त्याच विधानावर आता सभेत बोलताना शुभांगी पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाल्या शुभांगी पाटील?
जळगावमधील सभेत बोलताना शुभांगी पाटील म्हणाल्या की, संजय राऊत यांच्या कार्यालयाच्या बाहेर तिकीटासाठी विनवण्या करत होता, त्याच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तिकीट दिला, पान टपरीवाला खरा असतो, पण तुमच्यासारखे काही लोकंच खोके घेऊन गद्दारी करतात. अशी टीका त्यांनी यावेळी नाव न घेता गुलाबराव पाटलांवर केली.
पुढे त्या म्हणाल्या की, मी शेतकऱ्याची लेक म्हणून चलेंज देते, घुसन दाखवा, तुमची राहिलेली सुद्धा राहणार नाही, ही जनताच तुम्हाला सोडणार नाही. जो बाप चोरतो तो कधीच दुसऱ्याचं हित करु शकतो. ही खान्देशची भूमी आहे, या खान्देशाच्या भूमीत महिला फार मोठ्या झाल्या. बोलण्याची संधी दिली म्हणून धन्यवाद न मानता याच जिल्ह्यात पुन्हा जन्माला यावं अशी इच्छा व्यक्त करते. अस त्यावेळी म्हणाल्या.