'भाजपचा मतीमंद प्रदेशाध्यक्ष..' वज्रमुठ सभेतून नितीन देशमुखांची बावनकुळेंवर सडकून टीका
राज्यात सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ सुरू आहे. तर दुसरीकडे मविआत नाराजी असल्याचे देखील समोर येत आहेत. या सर्व घडामोडी दरम्यान आज नागपुरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा आयोजित करण्यात आली. याच सभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले.
काय म्हणाले नितीन देशमुख?
सभेत बोलताना देशमुख म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार ईडीच्या अशिर्वादने आले आहे. ते कसे आले हे सर्वात जास्त मला माहीत आहे. भाजपने लावलेल्या ईडीच्या चौकशीच्या ससेमिऱ्यामुळे हे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे शिवसेनेत फूट पडली. भाजपकडून सुरू असलेल्या ईडीच्या धोरणामुळे आशिया खंडात महाराष्ट्राची बदनाम झाली. त्या ४० आमदारांना गद्दार म्हणून ओळखले जाऊ लागेल. हा भाजपने राज्याच्या प्रतिमेवर लावलेला कलंक आहे." अशी टीका त्यांनी भाजपवर केलीय.
पुढे ते म्हणाले की, आठ-दहा दिवसांपूर्वी भाजपचा मतीमंद प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की, उद्धव ठाकरेंना मातोश्रीबाहेर निघू देणार नाही. माझं त्या मतीमंद प्रदेशाध्यक्षांना आवाहन आहे, मातोश्रीच्या बाहेर सोडा, उद्धव साहेब नागपुरात आले. शिवसैनिकांना नागपुरात येऊन दाखव तेव्हा मी म्हणेल भाजपचा प्रदेशाध्यक्ष मतीमंद नाही म्हणून. अशी जोरदार टीका त्यांनी बावनकुळे यांच्यावर केली. अधिवेशनात आम्ही देवेंद्र फडणवीस यांचं भाषण ऐकतो, आमचे ४० आमदारही म्हणतात की, नरेंद्र मोदी यांचा फोटो बघून आम्ही निवडून आलो. २०१४ ला शिवसेने वेगळी लढली होती. २०१९ला आम्ही एकत्र निवडणूक लढलो. पण शिवसेनेचे आमदार कमी झाले. असे देखील ते म्हणाले.