'पालकमंत्री जर बालक मंत्र्यांसारखे...' सुषमा अंधारेंची गुलाबराव पाटलांवर जोरदार टीका
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगावमधील पाचोरा येथे जाहीर सभा होत आहे. या सभेपूर्वी जळगामधले राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले. शिंदे गट- ठाकरे गटात शाब्दिक वाद देखील चांगलाच उफाळून बाहेर येत आहे. दरम्यान याच जळगावमधील सभेत बोलताना शिवसेना ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटासह मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
सभेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, या सभेच्या आधी अनेक वल्गना झाल्या. काही लोकांनी सभा रद्द करण्याचे प्रयत्न केले. या खूर्च्या 25 हजारच आहेत. उदय भाऊ म्हणाले 8 हजार खुर्च्या आहेत, तंबाखू चोळणारे अजून एक होते, शंभूराज देसाई तंबाळू चोळता चोळता म्हणाले, अहो गर्दीच होणार नाही. किशोर आप्पा, उदय भाऊ, शंभूराज देसाई यांनी स्वत: यावं आणि खुर्चा मोजाव्यात. अशी टीका त्यांनी यावेळी केली.
पुढे त्या म्हणाल्या की, राहिला प्रश्न गुलाबराव पाटील यांचा महाप्रबोधन यात्रेत मी नाकावर टिच्चून चार सभा घेतल्या. पाचवी सभा घेऊ न देण्याचा प्रयत्न केला. पण ऑनलाईन 25 लाख लोकांनी ती सभा पाहिली. पालकमंत्र्यांना संविधानाचं पालन करुन बोलावं. बालिश विधान करणाऱ्या पालकमंत्र्याला हे कसे कळेल. पालकमंत्री जर बालक मंत्र्यांसारखे वागत असतील तर आम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? असा सवाल शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.