'हा निकाल देशाला एक नवी दिशा देणारा' भास्कर जाधवांची भाजपवर जोरदार टीका
संपूर्ण देशाचे लक्ष आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे आहे. या निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या निकाला नंतर राज्यात काँग्रेसचं वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. 224 जागांसाठी कर्नाटक निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि जेडीएस रिंगणात उतरले होते. या रणसंग्रामात काँग्रेसने गड जिंकत काँग्रेसने 125 जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले आहे.
नेमकं काय म्हणाले?
कर्नाटकच्या निकालावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, आजचा कर्नाटकचा निकाल हा देशाला एक नवी दिशा देणारा आहे. सर्व मतदारांचे अभिनंदन. जिंकून आलेल्या उमेदवारांचंही अभिनंदन. तसेच काँग्रेसचे प्रमुख मलिकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांचंही भास्कर जाधव यांनी अभिनंदन केलं आहे.
पुढे ते म्हणाले की, भाजप हटाव संविधान बचाव, भाजप हटाव देश बचाव, लोकशाही बचाव, हा निकाल कर्नाटकच्या जनतेने दिला आहे. भाजपला पराभूत करायचं असेल असंच एकजूट होऊन काम करावं लागेल, असेही भास्कर जाधव म्हणाले आहे.