...यांच्याशी युती करून भाजपने कोणतं हिंदुत्व साधलं होतं? दानवेंनी थेट शेअर केली यादी
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शाब्दिक वाद सुरू असताना काल नांदेडमधील सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेनंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आहे. याच पार्श्वभूमीवर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अमित शहांना भाजपने आतापर्यंत युती केलेल्या देशातील नेत्यांची यादी देत प्रतिप्रश्न केला आहे.
काय केला दानवेंनी प्रश्न?
अमित शाह यांनी केलेल्या टीकेला अंबादास दानवेंनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले की, युती तोडून शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असा आरोप विरोधक सातत्याने आमच्यावर करतात. काल केंद्रीय गृह मंत्री अमित शाह पण बोलले. मग ज्यांचे नाव मी खाली देतोय, यांच्याशी युती करून भाजपने कोणतं हिंदुत्व साधलं होतं? असा प्रतिप्रश्न केला आहे.
पुढे त्यांनी भाजपने युती केलेला आतापर्यंत विविध पक्षांची नावे लिहिली आहे. फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती. अकाली दल, ओम प्रकाश चौटला, मायावती, नितीश कुमार, ममता बॅनर्जी. नवीन पटनायक. चंद्राबाबू नायडू, देवेगौडा यांचा जनता दल, अजून साधारण २० नावं आहेत माझ्याकडे. अशी यादी त्यांनी ट्विटरवर शेअर केली. २०२४ लोकसभेपुर्वी यांच्यापैकी कोणी गळाला लागतो का, याचे प्रयत्न सध्या भाजपकडून सुरूच आहेत. महाराष्ट्रात मात्र ही डाळ शिजणार नाही. सेक्युलर चेहरे असलेल्या लोकांशी हे देशभर युती करत फिरणार, पण यांचं हिंदुत्व शाबूत, अन आम्हीच सोडलं म्हणता. असं कसं चालेल? असा सवाल त्यांनी केला.