'ढेकणं चिरडायला तोफेची गरज नाही' उद्धव ठाकरेंचा घणाघात
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूनमधील खेड येथे शिवगर्जना यात्रेनिमित्त आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह दिल्यानंतर पहिल्यांदाच सभा झाली. त्यामुळे सर्वांचेच लक्ष उध्दव ठाकरे यांच्या या सभेवर होते. यासभेत ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वच विषयावर भाष्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांवर आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले. जे भुरटे, चोर, गद्दार आहेत, तोतया आहेत. त्यांना मला सांगायचे तुम्ही शिवसेना नाव चोरू शकतात पण शिवसेना नाही. अशी टीका त्यांनी यावेळी दिली. सोबतच त्यांनी निवडणुक आयोगावर देखील निशाणा साधला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे भाषणात?
उद्धव ठाकरेंनी आजच्या भाषणाच्या सुरुवातीला जमलेल्या कार्यकर्त्यांचा गर्दीचे वर्णन केल ते म्हणाले की, या अभूतपूर्व दृशाचे वर्णन काय करायचे डोळ्यात मावत नाही असे हे आई जगदबेंचे रुप आहे. लहानपणापासून मी शिवसेना प्रमुखांचे भाषण ऐकत आलो होतो. पण तेव्हा ते म्हणत होते आई जगदंबेचे रुप दिसते, ते मला कधी दिसले नाही पण ते आज मला दिसले. तुम्ही देव माणसे आहात देवाचे रूप आहात दुसर काय नाव देऊ वर्णन काय करू. कारण ज्यांना जे शक्य होत तुम्तेही मोठ केल सगळ दिल पण ते ५० खोक्क्यात बंदिस्त झाले. अशी टीका त्यांनी यावेळी शिंदे गटावर केली.
जे भुरटे, गद्दार, चोर आहेत तोतया आहेत
पुढे ते म्हणाले की, आज तर माझ्या हातात काही नाहीये. माझे हात रिकामे आहेत मी तुम्हाला काही देवू शकत नाही तरी तुम्ही माझ्यासोबत आले आहात. आज मी तुमच्याकडे मागायला आलो. मला तुमची साथ हवी आशीर्वाद हवा आहे. जे भुरटे, गद्दार, चोर आहेत तोतया आहेत. मला त्यांना सांगायचे तुम्ही शिवसेना नाव चोरू शकतात पण शिवसेना नाही.धनुष्य बाण चोरू शकताल पण पेलू शकणार नाही. मी मागे बोललो रावण उताणा पडला धनुष्य घेऊन तर हे मिंधे कुठे पेलू शकणार. असा घणाघात त्यांनी यावेळी शिवसेनेवर केला.
निवडणुक आयुक्तांना आयुक्त म्हणून राहण्याचा अधिकार नाही
निवडणुक आयोगाचा निर्णयावर बोलताना ते म्हणाले की, मला निवडणुक आयोगाला सांगायचं तुम्हाला जर मोती बिंदू झाला नसेल तर इकडे येऊन बघा खरी शिवसेना कोणती हे बघायला या. हा चुना लगाव आयोग आहे. सत्तेचे गुलाम आहे. निवडणुक आयोग म्हणून राहण्याचा अधिकार नाही. शिवसेनेची स्थापना निवडणुक आयोगाचा वडिलांनी नाही तर माझा वडिलांनी केली आहे. निवडणुक आयुक्तांचे वडीलवर बसले असतील पण माझे नाही. अशी देखील बोचरी टीका त्यांनी निवडणूक आयोगावर केली.
जे शिवसेना तोडण्याचा प्रयत्न करता मला त्यांना एक सांगायचे
पुढे बोलताना त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, जे शिवसेना तोडण्याचा प्रयत्न करता मला त्यांना एक सांगायचे तुम्ही नेमकं काय करता? तुम्ही शिवसेना फोडण्याचा प्रयत्न नाही करत आहे. तुम्ही मराठी माणसाच्या एकजूटीवर घाव घालत आहे. हिंदुच्या एकजूटीवर घाव घालता आहात. जे हिंदुत्व उभे करण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी अख्ख आयुष्य वेचले. जे हिंदुत्व आज उभे राहिल्यानंतर ज्यांनी तुम्हाला साथ सोबत दिली. अरे तुम्हाला कोण विचारत होत तुम्हला गल्लीतल कुत्र विचारत नव्हत भाजपला. शिवसेना प्रमुख उभे राहिले नसते तर आज कुठे दिसले असते का? पण एवढ्या निष्ठुर पणे वागता ज्यांनी साथ दिली पहिले त्यांना संपवा अस करता बघा प्रयत्न करून. आज संजय कदम हे शेकडो लाखो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत आले. होय मी शिवसेनाच म्हणणार कारण निवडणुक आयोगाचा निर्णय मला मान्य नाही. अजिबात नाही निवडणुक आयोग पक्ष चिन्ह नाव देऊ शकतो पण शिवसेना नाही. असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
मला शिवसेना प्रमुखांनी शिकवलं
मैदानाच नाव सुद्धा चांगल आहे गोळीबार मैदान मला शिवसेना प्रमुखांनी शिकवल. म्हणाले, ढेकणं चिरडायला तोफेची गरज नाही, ही अशीच चिरडाची असतात. यांच्यासाठी तर गोळीबार करण्याची गरज नाही. हे ढेकणं आपले रक्त पेवून फुगलेली आहे. त्यांना चिरडण्याची ताकद तुमच्या एका बोटात आहे. मतदानाचा दिवशी एक बोट त्यांना चिरडणार आहे. तोफा देशद्रोही लोकांविरुद्ध वापरायचे असती. पण दुर्दैव आपले असे की ज्यांना आपण आपले कुटुंब मानले. तुम्ही त्यांना मोठ केले पण त्यांनीच आपल्या आईवर आघात केला. हो शिवसेना आपली आईच आहे. शिवसेना ही चार शब्द आपल्या जीवनात नसते तर आपण कुठे असतो. तुम्ही आम्ही कोण असतो? असा देखील सवाल त्यांनी यावेळी केला.
आम्ही म्हणजे शिवसेना असे तुम्हाला वाटत तर घ्या स्वीकारा आव्हान
आम्ही म्हणजे शिवसेना असे तुम्हाला वाटत तर घ्या स्वीकारा आव्हान आणि तुमच्या आई वडिलांचे नाव लावा लाज वाटत नसेल तर आणि पक्ष उभा करून दाखवा. चिन्ह गोठवल नाव गोठवल चिन्ह बदललं तरी आपण जिंकलो. बाळासाहेबांचे विचार म्हणजे काय बाळासाहेबांचे विचार आणि यात असे काही लोक आहेत ज्यांनी बाळासाहेबांना जवळून बघितलं नाही आणि ते आपल्याला बाळासाहेबांचे विचार शिकवणार? ज्याचं राजकीय आयुष्य तुमच्यामुळे ते विचार शिकवणार. अलीकडच १०, १५ वर्षात यांचे राजकीय आयुष्य फुलले ते आपल्याला विचार शिकवणार. अशी जोरदार टीका यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली.