Ameya Gholap
Ameya GholapTeam Lokshahi

ठाकरे गटाला आणखी एक धक्का! आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अमेय घोले शिंदे गटात, 'या' नेत्यांवर केले आरोप

आदित्य जी आपली मैत्री ही केवळ राजकारणापुरती नाही. तुमच्या बरोबरचा संघटनेतील माझा प्रवास थांबवत असलो तरी आपली मैत्री कायम राहावी हीच अपेक्षा व्यक्‍त करतो.
Published by :
Sagar Pradhan
Published on

काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाली. त्या बंडखोरीमुळे राज्यात चांगल्याच राजकीय उलथापालथी पाहायला मिळाल्या. बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट पडले. त्यानंतर अनेक नगरसेवक, खासदार, आमदार आणि यांच्यासोबतच कार्यकर्तेही ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले. परंतु, ठाकरे गटाची गळती अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाहीये. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक अमेय घोले अखेर आदित्य ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच त्यांनी पत्र लिहित पक्ष सोडण्याचे कारण सांगितले आहे.

Ameya Gholap
"राज्यात लवकरच ऑपरेशन कमळ" पृथ्वीराज चव्हाण यांचा लोकशाही मराठीवर खळबळजनक दावा

काय लिहले अमेय घोले यांनी पत्रात?

आदित्य ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात अमेय घोले म्हणाले की, मी राजकारणात आलो तुमच्यामुळे. तुम्ही माझ्या वर विश्वास दाखवलात आणि मला युवा सेनेच्या माध्यमातून संधी दिली. तुम्ही दिलेली प्रत्येक जबाबदारी मी गेले १३ वर्ष अत्यंत प्रामाणिकपणाने पार पाडली. परंतु वडाळा विधानसभा मतदारसंघात काम करत असताना महिला संघटक श्रद्धा जाधव आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांनी माझ्या कामात वारंवार अडथळे आणायचा प्रयत्न केला त्यामुळे मला काम करताना खूप त्रास व मनस्ताप झाला. असा आरोप त्यांनी केला.

पुढे ते पत्रात म्हंटले की, याबाबत मी आपल्याला वेळोवेळी माहिती दिली होती. संघटनेतील काही मतभेद दूर व्हावे व मला सुरळीतपणे माझे कार्य सुरू ठेवता यावे म्हणुन मी खूप प्रयत्न केला. परंतु काही कारणास्तव यावर काहीच मार्ग काढला गेला नाही. त्यामुळे आज अखेरीस जड अंतःकरणाने मला युवासेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो आहे. सांगण्यास अत्यंत दुःख होत आहे की आज मी माझ्या युवासेनेच्या - कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. आदित्य जी आपली मैत्री ही केवळ राजकारणापुरती नाही. तुमच्या बरोबरचा संघटनेतील माझा प्रवास थांबवत असलो तरी आपली मैत्री कायम राहावी हीच अपेक्षा व्यक्‍त करतो. अशा शब्दात त्यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com