आमदार बंब विरोधात शिक्षक एकवटणार, औरंगाबादेत भव्य मोर्चा
नुकताच काही दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांविरुद्ध आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यावरून शिक्षक आणि प्रशांत बंब यांच्यात युद्ध सुरु झाले. त्यानंतर बंब यांनी विधानसभेत सुद्धा हा प्रश्न मांडला होता.
त्यानंतर शिक्षकांचा आणि त्यांचा संघर्ष आणखीच बळकट झाला. शिक्षकांची मागणी होती की, बंब यांनी माफी मागावी मात्र बंब आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम आहेत. मुख्यालयाचा वाद आणखी संपला नसला तरी शिक्षक व पदवीधर मतदारसंघच रद्द करा, अशी मागणी करत बंब यांनी शिक्षक व पदवीधर आमदारांना देखील अंगावर घेतले आहे.
याच पार्श्वभूमीवर शिक्षक व पदवीधर आमदार आक्रमक झाले असून आमदार बंब यांच्या विरोधात येत्या ११ सप्टेंबर रोजी औरंगाबादेत भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. शहरातील आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालायपर्यंत शिक्षकांचा हा भव्य मोर्चा निघणार आहे. शिक्षकांचे आणि मोर्चाचे नेतृत्व शिक्षक आमदार विक्रम काळे, कपिल पाटील, पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण हे करणार आहेत.