मोठी बातमी! सुधीर तांबेंचे कॉंग्रेस पक्षातून निलंबन
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच नाशिक पदवीधर मतदारसंघातील जागेमुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्या ठिकाणी डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. परंतु त्यांनी अर्ज न भरता मुलाला अर्ज भरायला लावला. दुसरीकडे भाजपने त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही. भाजप तांबे यांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा देखील होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीत प्रचंड वाद निर्माण झाला. त्यामुळे तांबे पिता- पुत्रांवर शंका निर्माण झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने आता सुधीर तांबे यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.
काँग्रेस पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाने ही कारवाई केली असल्याचं पत्र जारी करण्यात आलं आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबेंचे पक्षातून निलंबित असणार आहेत .या संपूर्ण प्रकरणाची महाराष्ट्र काँग्रेसने हाय कमांडला माहिती दिली होती. यावरुन हायकमांडनं सुधीर तांबेंना निलंबित केलं आहे.