...तर उदयनराजे तडकाफडकी राजीनामाही देतील; सुषमा अंधारेंचा टोमणा
पुणे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये शिवसेना नेत्या सुषमा अंधारे व भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले सहभागी झाले होते. परंतु, उदयनराजेंनी कोणतेही भाष्य न केल्याने सुषमा अंधारे यांनी टोमणा मारला आहे. उदयनराजे वेळ प्रसंगी भाजपचा राजीनामाही देतील, असेही त्यांनी म्हंटले आहेत.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, राज्यपाल पदाबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. पण, त्यावर बसलेली व्यक्ती आदराची लायकीची नाही. कोश्यारी हे राज्यपाल असल्याचे विसरत आहेत. जेव्हा जेव्हा ते महापुरुषांच्या बद्दल बोलले तेव्हा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी थांबवले नाही आणि ४० चुकार भावांनी देखील त्यांना थांबवले नाही.
उदयनराजे इथं येऊन (स्टेजवर) बोलतील असं वाटलं होतं, पण ते थांबले नाहीत. कदाचित महापुरुषांचा अवमान सहन न झाल्याने खासदारकीचा राजीनामा देण्यासाठी तडकाफडकी गेले असतील. उदयनराजे वेळ प्रसंगी भाजपचा राजीनामाही देतील, असा निशाणा त्यांनी साधला आहे.
आता प्रसाद लाड इतक्या लाडात आले की आमच्या डोक्यावर प्रसाद वाटायला लागले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृवात हे सुनियोजित षडयंत्र सुरू आहे. मोदींना जेव्हा खर्गे हे रावण म्हणले होते. तेव्हा ते आलामपणाहसाठी बोलण्यासाठी पुढे आले. भाजप किती दुटप्पी आहे याचे हे प्रमाण आहे. टीम देवेंद्र यांनी निंदाजनक ठराव मांडला नाही, अशी टीकाही अंधारेंनी केला आहे.
टीम देवेंद्र यांना सांगितले पाहिजे की आपल्या मंत्रिमंडळात जे मंत्री महिलांबद्दल वक्तव्य करतात ती महाराजांचा वारसा सांगणारी नाहीत. काल आपल्या नीतूने काहीतरी वक्तव्य केले आता नितेश, नीलू हे बालिश बुद्धीचे आहेत. उद्योग गुजरातला, मंत्री गुवाहटीला, गावं कर्नाटकात आणि आपण आज लाल महालात, असेही सुषमा अंधारे यांनी म्हंटले आहे.