दिशा सालियान प्रकरणी SIT स्थापन; अमृता फडणवीसांचं नाव घेत अंधारेंचा निशाणा, म्हणाल्या...

दिशा सालियान प्रकरणी SIT स्थापन; अमृता फडणवीसांचं नाव घेत अंधारेंचा निशाणा, म्हणाल्या...

दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना केली आहे. यावरुन सुषमा अंधारे यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे.
Published on

मुंबई : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना केली आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षांनी केली. यानंतर सरकारने याबाबत चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. तर, सुषमा अंधारे यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे.

दिशा सालियान प्रकरणी SIT स्थापन; अमृता फडणवीसांचं नाव घेत अंधारेंचा निशाणा, म्हणाल्या...
तेच यांचे 'पॉलिटिकल मास्टर्स'; किल्लारीकरांच्या आरोपांना फडणवीसांचे प्रत्युत्तर

सुषमा अंधारे म्हणाल्या की, सीबीआयने दिशा सलियान प्रकरणी अपघाती मृत्यू असा निर्वाळा दिल्यानंतर ही एसआयटी नेमायची असेल तर नक्की नेमा. कर नाही त्याला डर कसली, असे त्यांनी म्हंटले आहे. पण सोबतच एक-एक एसआयटी जज लोया आणि अनिक्षा जयसिंगानी, अमृता फडणवीस या प्रकरणात ही नेमली जावी एवढी माफक अपेक्षा आहे, अशी मागणी अंधारेंनी केली आहे.

दरम्यान, सरकारनं अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्वात एसआयटीची घोषणा केलीय. एसआयटीत पोलीस उपायुक्त अजय बंसल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचा समावेश आहे. यावर सत्ताधारी घाबरतायत त्यामुळंच एसआयटीच्या चर्चा सुरु असल्याचा पलटवार आदित्य ठाकरेंनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com