Sushma Andhare : सुषमा अंधारेंनी लगावला खाते वाटपावरुन टोला; म्हणाल्या...
नांदेड: आमच्याकडील तिकडे गेलेली जी 40 चुकार भावंड आहेत त्यांनी अजित दादांना कंटाळून तिकडे जात असल्याच सांगितले होते. आता तेच दादा त्याच खात्याच्या पदावर आहेत. या निमित्ताने राजकीय नैतिकता हरवलीय का हा प्रश्न आता समोर येतोय,असं म्हणत सुषमा अंधारे यांनी अजित दादा यांना शुभेच्छा देत शिवसेनेच्या आमदारांना टोला लगावला आहे.
अर्थ खात हे सर्वात महत्वाचं खात असतं आणि स्वतः मुख्यमंत्री व अर्थ मंत्रीच या खात्यात हस्तक्षेप करीत असतात, त्यामुळे फडणवीस आता बाजूला झालेत. प्रत्येक खाते वाटपाच्यावेळी फडणवीस आणि मुख्यमंत्री सोबत जायचे यावेळी दादा एकटेच गेले होते यावरून फडणवीस यांच केंद्रातूनही वजन कमी झालय. आता त्यांना बाजूला सारलं जात आहे. त्यामुळे अंतिम शब्द हा अजित दादांचाच असणार असल्याचं अंधारे यांनी सांगितले आहे.
अब्दुल सत्तार यांचं खातं गेल्यानंतर मला नक्कीच वाईट वाटलंय,पण शिंदे गटाला हा पहिला झटका आहे, पुढे जेव्हा अजित दादा मुख्यमंत्री होतील तेव्हा बघा. असा टोला लगावत अजित पवार यांनी अंधारेंना शुभेच्छा दिल्या आहेत.