...तर पुरुषांना म्हसोबाची माळ म्हणणार का? सुषमा अंधारेंचे लोढांवर टीकास्त्र

...तर पुरुषांना म्हसोबाची माळ म्हणणार का? सुषमा अंधारेंचे लोढांवर टीकास्त्र

राज्यभरातील विधवा महिलांना सन्मान मिळण्यासाठी एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
Published on

मुंबई : राज्यभरातील विधवा महिलांना सन्मान मिळण्यासाठी एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आता विधवा महिलांना विधवा या नावाने नाहीतर त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी ‘गंगा भागिरथी’ या शब्दाचा वापर करावा असा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आदेश दिले आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते सुषमा अंधारे यांनी टीकास्त्र सोडले आहे.

...तर पुरुषांना म्हसोबाची माळ म्हणणार का? सुषमा अंधारेंचे लोढांवर टीकास्त्र
भेगा पडलेली वज्रमूठ आमचा सामना करु शकत नाही : देवेंद्र फडणवीस

ज्या खात्याला महिला मंत्री नाही तिथं असंवेदनशीलता दिसून येणारच. गंगा भगीरथी महिलांना म्हणणार तर मग पुरुषांना म्हसोबाची माळ म्हणणार का? असा फाजीलपणा लोढा यांनी करु नये. माझं तर म्हणणं आहे की लोढा यांनी जास्त लोड घेऊ नये, अशी जोरदार टीका सुषमा अंधारेंनी लोढा यांच्यावर केली आहे. त्यापेक्षा त्यांनी विधवांचे जीवन जास्त सुखकर होण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी मंगल प्रभात लोढांना दिला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आणि 'भारत हे हिंदू राष्ट्र होते हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्रच राहिल' असलेले ट्वीट भाजपच्या ट्वीटर पेजवर करण्यात आले आहे. यालाही सुषमा अंधारेंनी उत्तर दिले आहे. हे हिंदू राष्ट्र म्हणायचं असेल तर बाकी सर्वांना वाऱ्यावर सोडणार आहात का? जर हिंदू अजेंडा असेल तर मग भारतीय जनता पार्टीचे नाव बदलून हिंदू जनता पार्टी हे नावं करावं, असा निशाणा अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांवर साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com