ललित पाटीलसाठी दादा भुसेंनी फोन केला होता; अंधारेंचा गंभीर आरोप

ललित पाटीलसाठी दादा भुसेंनी फोन केला होता; अंधारेंचा गंभीर आरोप

शेकडो कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळून गेला आहे. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केला
Published on

पुणे : शेकडो कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळून गेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ललित पाटील याच्या भावाला अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ड्रग्जमाफिया ललित पाटीलसाठी दादा भुसेंनी ससून रुग्णालयाला फोन केला होता, असा आरोप अंधारेंनी केला आहे.

ललित पाटीलसाठी दादा भुसेंनी फोन केला होता; अंधारेंचा गंभीर आरोप
अजित पवार यांचा पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा

सुषमा अंधारे म्हणाल्या की, ड्रग्जमाफिया ललितला ससूनमध्ये अ‍ॅडमिट करण्यासाठी भुसेंनी फोन केला होता, त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासा. ललित पाटील ससूनमध्ये अ‍ॅडमिट असताना तिथूनच तो ड्रग्ज रॅकेट चालवायचा. ससून हॉस्पिटलच्या बाहेर ड्रग्ज सापडलं होतं. तसेच ससूनमध्ये राहण्यासाठी ललित पाटील वरिष्ठांना रोज ७० हजारांची लाच देत होता, असा मोठा त्यांनी गौप्यस्फोट केला आहे.

दरम्यान, कॉंग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनीही ललित पाटील प्रकरणी शिंदे गटावर मोठा आरोप केला आहे. ड्रग माफिया ललित पाटील पळून जाण्यात शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. यामुले राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com