Spriya Sule: डीपीडीसीच्या निधीवरुन सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
डीपीडीसीच्या निधीवरुन सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल केला आहे. आम्ही निधी मागितला की त्यावर फुली मारली जाते असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. जनतेच्या कामासाठी निधी मागतोय, स्वत:साठी नाही, मविआ काळात सर्वांना निधी दिला जायचा असा महायुती सरकार संविधान विरोधी असल्याचा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
आम्ही चौघांनी अनेक लिस्ट देतोय आणि सातत्याने आम्ही जो जो निधी मागतो त्याच्यावर काठ मारली जाते, आम्हाला निधी दिला जात नाही, याच आम्हाला वाईट वाटतंय आणि याच आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आलो आहोत. आम्ही आमच्या घरासाठी पैसे मागत नाही आम्ही आमच्या रस्त्यासाठी पैसे मागतोय, आम्ही आमच्या वैयक्तिक कुठल्याही लाभासाठी आलो नाहीत मायबाप जनतेच्या सेवेसाठी आम्ही लोकप्रतिनिधीमधून मायबाप जनतेनी आम्हाला निवडणून दिलं आहे.
जनतेचे काम आहेत त्यासाठी आम्ही सरकार कडे निधी मागत आहे, आणि हा कुठलाही निधी आमच्या चौघांच्या मतदारसंघात आणि अमोलदादा जे सूचना करतात ते दिलेले जात नाहीयेत तर त्याचा जाहीर निषेध करायला आणि हे पूर्णपणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात आहेत असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.