supriya sule | NCP | BJP
supriya sule | NCP | BJP team lokshahi

सुप्रिया सुळेंचा भाजपला इशारा, राष्ट्रवादीचा विरोधक कोण? यावरही दिलं स्पष्टीकरण

कितीही मोठी ताकद आली तरी महाराष्ट्र नेस्तनाबूत होऊ शकणार नाही
Published by :
Shubham Tate
Published on

Supriya Sule : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आज मुंबई यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडली. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) राज्य कार्यकारिणीची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. (Supriya Sule warning to BJP)

supriya sule | NCP | BJP
Oppo चा नवा स्मार्टफोन लॉन्च, मिळणार 12 GB रॅम आणि लेटेस्ट प्रोसेसर

विरोधी पक्षात असताना लोकांनी शरद पवारांना जास्त प्रेम दिले आहे. सत्तेत असतानाही दिले आहे. आता जे काही 105 असल्याचे बोलत आहेत, त्यात आपल्या पक्षातून गेलेले आपले 50 आहेत हे लक्षात ठेवा, अशा शब्दात फटकारले. आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. काय करायचं असं जेव्हा साहेबांना विचारते त्यावेळी पवारसाहेब पावसाचे वातावरण थोडे कमी झाल्यावर गाडी बाहेर काढून शेवटच्या युवकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत आहेत. अशी माहिती यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी दिली.

supriya sule | NCP | BJP
...त्यामुळे शिवसेनेचा द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर; उद्धव ठाकरे

शून्यातून आपण पुन्हा उभे राहू आणि पूर्ण ताकदीने पक्ष संघटना उभी करू असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. कितीही मोठी ताकद आली तरी महाराष्ट्र नेस्तनाबूत होऊ शकणार नाही. मविआ सरकारमध्ये मंत्रिपद असताना आपल्या पक्षाच्या प्रत्येक नेत्याने प्रामाणिकपणे अभिमानास्पद काम केले, असे कौतुकोद्गार सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना काढले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com