राजकारण
प्रत्येक भाऊ बहिणीची काळजी करतोच असं नाही; सुप्रिया सुळेंनी संसदेत व्यक्त केली खंत
महिला आरक्षण विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या पटलावर ठेवले आहे. यावर आज चर्चा सुरु असून राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली.
नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या पटलावर ठेवले आहे. यावर आज चर्चा सुरु असून राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली. यादरम्यान अमित शहा यांनी भावावरून केलेल्या वक्तव्याचा दाखला देत प्रत्येक घरात असे भाऊ नसतात, असे सुप्रिया सुळेंनी म्हंटले आहे. या विधानाचा रोख नेमका कुणाकडे? अशा चर्चांना उधाण आले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अमित शहा यांनी एक विधान केलं इथं की भाऊ का करू शकत नाही, भाऊसुद्धा करू शकतो. पण प्रत्येक घरात असे भाऊ नसतात जे बहिणीच्या कल्याणाचा विचार करतात. प्रत्येकाचं नशीब इतकं चांगलं नसते, असे त्यांनी म्हंटले आहे.