रोहित पवारांची आज ईडी चौकशी; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया म्हणाल्या...
बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीनं छापेमारी केली होती. बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयांवर छापेमारी करत ईडीकडून तपास करण्यात आला होता. यावर रोहित पवारांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आज रोहित पवारांची ईडी चौकशी होणार आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सत्यमेव जयते. सत्याचा विजय होईल. हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा. आव्हानांवर मात करुन विजय मिळवू. सध्या आमचा संघर्षाचा काळ सुरु आहे. रोहितला चौकशीसाठी बोलवणं यात काही आश्चर्य वाटत नाही. रोहित पवारांनी यात्रा काढली त्यामुळे कारवाई.
90 ते 95 टक्के खटले हे विरोधी पक्षावर. आम्ही ताकदीने, सत्याचा मार्गाने पुढे जाणार. सुडाचं राजकारण असण्याची शक्यता. तरुणांसाठी संघर्ष करत असल्याने कारवाई. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.