मी फडणवीसांवर आता कधीचं बोलणार नाही; का म्हणाल्या सुप्रिया सुळे असं?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षफुटीवर भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे अनेकवेळा प्रयत्न झाले. देवेंद्र फडणवीसांना काहीही करून सत्तेत यायचे असते, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. देवेंद्र फडणवीसांचा त्यांच्याच पक्षाने अपमान केला असल्याची टीकाही सुळेंनी केली आहे. त्या आज पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे अनेकवेळा प्रयत्न झाले आहेत. काहीवेळा हे प्रयत्न अपयशी ठरेल, तर काहीवेळा यश मिळालं. पक्ष फोडणे, साम-दाम-दंड-भेद हे देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले आहेत. त्यांना काहीही करून सत्तेत यायचे असते, असा निशाणा सुप्रिया सुळे यांनी साधला आहे.
राष्ट्रवादी पक्ष अजूनही फुटलेला नाही. एक गट सतेत्त एक विरोधात आहे. अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते व आमदार आहेत. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत. अजूनही आमचा पक्ष एकच आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. भाजपासोबत आमच्या पक्षाची आघाडी आणि युती नाही, असेही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले आहे.
मी फडणवीस यांच्या जागी असते तर मला वाईट वाटल असतं की १०५ लोकं निवडून आणायचे आणि उपमुख्यमंत्री व्हायचं. मी त्यांच्यावर आता कधीचं बोलणार नाही. त्यांच्या पक्षाने त्यांचा अपमान केला आहे, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
दरम्यान, कांदा लिलाव बंद आहे यावर मला नवल वाटत नाही. 4 महिन्यापासून पियूष गोयल यांना सांगत होते की की पॉलिसी करा. पण तसे केलं गेलं नाही. राज्यातील नव्या सरकारने त्यांना काय नावं दिलं आहे मला माहित नाही. पण, या सरकारमध्ये समन्वय नाही. कशाला कशाचा मेळ नाही. कुणी कुठले निर्णय घेत आहेत तेच कळत नाही, अशीही टीका त्यांनी केली.