घरी जा, स्वयंपाक करा; चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' विधानावरुन सुप्रिया सुळेंचा भाजपवर घणाघात, ही भाजपची मानसिकता

घरी जा, स्वयंपाक करा; चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' विधानावरुन सुप्रिया सुळेंचा भाजपवर घणाघात, ही भाजपची मानसिकता

महिला आरक्षण विधेयकावर सध्या संसदेत जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा संदर्भ देत सुप्रिया सुळेंनी भाजपवर घणाघात केला आहे
Published on

नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयकावर सध्या संसदेत जोरदार चर्चा सुरू आहे. या विधेयकाचे विरोधी पक्ष समर्थन नक्की करत असले तरी भाजपवर हल्ला चढवण्याची एकही संधी सोडत नाहीये. या विधेयकावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली. यावेळी चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा संदर्भ देत सुप्रिया सुळेंनी भाजपवर घणाघात केला आहे

घरी जा, स्वयंपाक करा; चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' विधानावरुन सुप्रिया सुळेंचा भाजपवर घणाघात, ही भाजपची मानसिकता
प्रत्येक भाऊ बहिणीची काळजी करतोच असं नाही; सुप्रिया सुळेंनी संसदेत व्यक्त केली खंत

निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निशिकांत दुबे म्हणाले की, इंडिया आघाडी महिलांना अपमानित करणाऱ्या आणि अपमानास्पद गोष्टी बोलणाऱ्यांच्या बाजूने आहे. मी त्यांना आठवण करून देतो की महाराष्ट्रातील भाजपच्या एका प्रमुख नेत्याने मला वैयक्तिकरित्या टेलिव्हिजनवर सांगितले होते की, सुप्रिया सुळेंनी घरी जावे, स्वयंपाक करावा, देश कोणीतरी चालवेल. ही भाजपची मानसिकता आहे, असा निशाणा त्यांनी साधला.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंबाबत मोठे विधान केले होते. ते म्हणाले की, कशासाठी राजकारणात राहाता. घरी जा, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही? कळत नाही? एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची? कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं? तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या, असे चंद्रकांत पाटलांनी म्हंटले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com