Supriya Sule : प्रेमाने मागितलं तर सगळं दिलं असतं, हिसकावून नाही घ्यायचं, हिसकावून घेतलं तर काहीच देणार नाही
थोडक्यात
कोल्हापूरच्या शिरोळ मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ
खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शुभारंभ
सुप्रिया सुळेंची नाव न घेता अजित पवार यांच्यावर टीका
कोल्हापूरच्या शिरोळ मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला.
याच ठिकाणी आयोजित जाहीर सभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर नाव न घेता टीका केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझी लढाई कशासाठी आहे. मी त्यांच्यासोबत गेले असते मंत्री झाली असते. का नाही मी गेले कारण मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे.
यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, वडिलांचा अधिकार त्यांनी मागितला असता ना सगळे प्रेमानी देऊन टाकलं असते. हेच तर बहिणींचे प्रेम त्यांना कळलं नाही ना. पण प्रेमाने मागायचं, हिसकावून नाही घ्यायचं. हिसकावून घेतलं तर काहीच येणार नाही. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.