मोठा नेता दिलदार असला पाहिजे, पणं, दुर्दैव...; सुळेंचा शिंदेंना टोला

मोठा नेता दिलदार असला पाहिजे, पणं, दुर्दैव...; सुळेंचा शिंदेंना टोला

दसरा मेळाव्यावरुन सुप्रिया सुळे यांची शिंदे सरकारवर टीका
Published on

मुंबई : दसरा मेळाव्यावरुन राज्यात राजकारण रंगत आहेत. यावरुन शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. अशातच शिंदे-फडणवीसांकडून शिवसेनेची कोंडी करण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. यासाठी शिंदे सरकारने मास्टर प्लॅन केल्याचीही माहिती मिळत आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारला अप्रत्यक्ष टोला लगाविला आहे.

शिवसेना दसरा मेळाव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे खूप दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री हे पद खूप मोठे असते आणि ते सर्वसमावेशक असेल पाहिजे असे पवार साहेब म्हणाले होते. आमच्याही काळात दसरे मेळावे व्हायचे. दिलदारपणे त्या व्यासपीठावर आमच्या विरोधात भाषणे व्हायची. आम्हीही उत्सुकतेने ते ऐकायचो आणि पाहायचो.

मोठा नेता हा फक्त पदांनी नाहीतर कर्तृत्वाने होतो. आणि दिलदार असतो. मोठा नेता दिलदार असला पाहिजे, पणं दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी ही गोष्ट आहे. पवार साहेब मुख्यमंत्री असताना बाळासाहेब शिवतीर्थावरुन दिलदारपणे टीका करायचे. याला गंमत म्हणातत, असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

मला आनंद होत आहे की देशाचे अर्थमंत्री बारामतीत येत आहेत. मी त्यांचं स्वागत करते. बारामती लोकसभा मतदार संघात अनेक चांगल्या गोष्टी, संस्था आहेत. त्यांना जर खरच वेळ भेटला तर त्यांनी भेट द्यावी, असे त्यांनी म्हंटले आहे.

नवाब मलिक यांना कधी डावललं नाही, मी रोज त्यांच्या मुलींशी बोलत असते. अजूनही ते आमचे चीफ स्पोक पर्सन आहेत. त्यामुळे नवाब मलिक अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्या कुटुंबाची २४ तास माझा कॉन्टॅक्ट असतो, असेही त्यांनी सांगितले आहे.

माझे आयुष्य सगळं पारदर्शक आहे. १३ वर्षापासून लोकप्रतिनिधी आहे. सोशल मीडियावर माझ्या कामाचा आढावा घेतला तर समजेल, देशातील लोक मला फॉलो करतात, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com