तुमच्या घरातील 12 मुलं गेलं असती तर कळलं असतं; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल, राजीनामा द्या
मुंबई : खोके सरकारने हॉस्पिटलमध्ये हत्याच केली आहे. पालकमंत्री पदासाठी दिल्लीत जायला वेळ होता. पण, त्या हॉस्पिटलमध्ये जायला वेळ नव्हता. मग ही हत्या नाही का, असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला केला आहे. त्या आरोग्य खात्याच्या मंत्र्याला सांगा राजीनामा द्या. तुमच्या घरातील 12 मुलं गेलं असती तर कळलं असते, अशा शब्दात त्यांनी तानाजी सावंतवर टीकास्त्र डागले आहे.
पुढील बारा महिने हे आपण इलेक्शन मोडवर असणार आहे. आजची परिस्थिती गंभीर आहे. एकेकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले कि मोठा भूकंप होईल असं म्हणायचे आणि मोठी बातमी बनायची. आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पालकमंत्री ठरवायला दिल्लीमध्ये जातात हे दुर्दैवी आहे, असा निशाणा सुप्रिया सुळे यांनी सरकारवर साधला आहे.
समृद्धी महामार्गामुळे मराठी माणसाच्या आयुष्यात काय बदल झाले. ही धोरणे आहेत पण त्याच्या आपल्या आयुष्यात उपयोग काय? शाळा कमी झाल्या आहेत आणि दारूची दुकाने वाढली आहेत, असे म्हणत त्या पुढे म्हणाल्या, महिला आरक्षणासाठी आम्हाला बोलावलं. आम्ही फार उत्साहाने गेलो आणि तिसऱ्या दिवशी महिला आरक्षण विधेयक मांडले. महिला आरक्षण म्हणजे जुमला आहे. चेक तयार आहे, रक्कम लिहिली आहे, सही केली आहे पण तारीख लिहिलेली नाही, अशी टीका सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारवर केली आहे.
कोविड काळात सगळ्यात उत्तम काम राजेश टोपे आणि अनिल देशमुख यांनी केले. पण त्यांना काय मिळाले. आज खोके सरकारने त्या हॉस्पिटलमध्ये हत्याच केली आहे. या दोघांना पालकमंत्री पदासाठी दिल्लीत जायला वेळ होता. पण, त्या हॉस्पिटलमध्ये जायला वेळ नव्हता. मग ही हत्या नाही का, असा सवाल त्यांनी विचारला आहे. त्या आरोग्य खात्याच्या मंत्र्याला सांगा राजीनामा दे. तुमच्या घरातील 12 मुलं गेलं असती तर कळलं असते, अशा शब्दात त्यांनी तानाजी सावंतवर टीकास्त्र डागले आहे.
माझी लढाई ही राजकीय आणि वैचारिक आहे. ती फक्त भाजपसोबत लढाई आहे. मी इतकी निर्दयी नाही. मला भाजपच्या लोकांचे वाईट वाटते. सतरंज्या त्यांनी उचलल्या आणि पंगत वाढली तेव्हा, अशी खोचक टीका सुप्रिया सुळेंनी भाजपवर केली आहे. सेवा सन्मान आणि स्वाभिमान हा एक कार्यक्रम घेऊन आपण महाराष्ट्रात जाऊया. जनतेची सेवा आणि शेतकऱ्यांचा स्वाभिमान आणि महिलांचा सन्मान करूया. माझे अश्रूंची आता फुले झाली आहेत. राष्ट्रवादी राष्ट्रवादी मध्ये भांडण नको. सेना सेना भांडण नको. भांडण फक्त भ्रष्ट जुमला पार्टी सोबत, असेही त्यांनी म्हंटले आहे.