ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास...; वटपौर्णिमा मित्ताने सुप्रिया सुळेंचा खास उखाणा
सूरज दहाट | अमरावती : पती-पत्नीचे नाते सात जन्म टिकावे यासाठी ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेला (Vat Purnima) सुवासिनींनी वडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले. जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी मनोभावे सौभाग्यवतींनी पूजा करतात. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही आज वटपौर्णिमेची पुजा केली आहे. यावेळी त्यांनी एक खास उखाणा घेतला. या उखाण्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये सौभाग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पती असलेले महिला मंगळागौरीपासून तर शेवटपर्यंत सण साजरे करतात. मात्र, विधवासाठी कुठलाही सण समारंभ नसतो. याच परंपरेला फाटा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज अमरावती येथे महिलांचे सोबत वटपौर्णिमेचे पूजन करून एक नवा पायंडा अमरावतीत पाडला आहे. सुप्रिया सुळे यांनी वडाची पूजा करून वटपौर्णिमा साजरी करत केली आहे, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी त्यांनी खास उखाणा सुद्धा घेतला. ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास सदानंदराव फस्ट क्लास, असा उखाणा सुप्रिया सुळे यांनी घेतला.
तर, जेजुरीच्या खंडेरायाला दर्शनासाठी सुप्रिया सुळे गेल्या असता राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर सदानंद सुळे यांनी त्यांना उचलून घेतले होते. याचा व्हिडीओही सोशल मीडिसावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीविषयी बोलताना सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षाला शुभेच्छा. शरद पवार म्हणालेत की आम्ही रिस्क घेतली होती. परंतू, त्यात यशस्वी झालो नाही. महाविकास आघाडीची मते इनटॅक्ट राहिली. मात्र, जे अपक्ष आमच्यासोबत नव्हते. ते आमच्यासोबत आले नाहीत. आम्ही याबाबत बसून चर्चा करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. तसेच, या निवडणुकीत ईडीचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर झाला का हा देखील प्रश्न आहे. तर . कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है. लेकिन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन है, अशी सूचक प्रतिक्रिया दिली होती.