Eknath Shinde and Supreme court
Eknath Shinde and Supreme courtTeam Lokshahi

Eknath shinde : पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको, पुढील सुनावणी सोमवारी

पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको, सुप्रीम कोर्ट
Published by :
Team Lokshahi
Published on

supreme court on Eknath shinde : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांनी पक्षांतर बंदी कायद्यानुसार, दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं, हाच एक पर्याय असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. तर आम्ही पक्ष सोडलाच नसल्याने पक्षांतर बंदी कायदा आम्हाला लागूच होत नसल्याचा युक्तिवाद हरिश साळवे यांनी केला. दरम्यान, सुप्रीम कोर्टातील या याचिकांवरील सुनावणी आज कोर्टाच्या पटलावर पहिल्याच क्रमांकावर ही याचिका सुनावणी होणार आहे, असे न्यायमूर्तींनी जाहीर केले. (supreme court on Eknath shinde vs shiv sena)

Eknath Shinde and Supreme court
सरकारने FRP त केली वाढ, आता एक क्विंटल ऊसाला दर किती?

दरम्यान, एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार तानाजी सामंत यामिनी जाधव संदिपान भुमरे भरत गोगावले संजय शिरसाट लता सोनावणे प्रकाश सुर्वे बालाजी किणीकर बालाजी कल्याणकर अनिल बाबर महेश शिंदे संजय रायमुलकर रमेश बोरनारे चिमणराव पाटील या 16 आमदारांवर टांगती तलवार आहे. दरम्यान, पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको, सुप्रीम कोर्टाने असा आयोगाला आदेश दिला आहे, आजची सुनावणी संपली आहे. पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

Eknath Shinde and Supreme court
सॅनिटरी पॅडवर श्रीकृष्णांचा फोटो पाहून यूजर्स संतापले

दरम्यान, एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवरून त्यांनी कोर्टासमोर काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. शिंदे गटातील आमदार अपात्र का ठरू शकत नाहीत, त्याची कारणमिमांसा करण्यात आली. आम्ही अद्याप पक्ष सोडलेला नाही किंवा पक्षाच्या आदेशाविरोधात मतदानही केलेलं नाही. त्यामुळे आमच्याविरोधात अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकत नाही. तसेच अध्यक्षांविरोधातच अविश्वास ठराव असल्यास ही कारवाई कशी होऊ शकेल, असा प्रश्न उपस्थित केला गेला. मात्र या सर्व स्थितीत राजकीय पक्षाला काहीच अर्थ उरत नाही का, अशा आशयाची टिप्पणी न्यायमूर्तींनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com