पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' विधानावर तटकरेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, सत्ता गेल्यानंतर...
मुंबई : 2014मध्ये राष्ट्रवादीनं आघाडी सरकार पाडलं. सरकार पाडलं नसतं तर मराठा आरक्षण टिकलं असतं, असे विधान करत पृथ्वीराज चव्हाणांनी मराठा आरक्षणाचं खापर राष्ट्रवादीवर फोडलं आहे. यावर आता अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
पृथ्वीराज चव्हाण हे राजकारणी आहेत असा माझा आतापर्यंतचा समज होता. त्यांना हल्ली विनोद का सुचतो ते काही कळत नाही, असा टोला तटकरेंनी लगावला आहे. सत्ता गेल्यानंतर आरक्षण टिकले नाही, असे म्हणण्याला अर्थ नाही. त्याची असे बोलण्यामागची भूमिका काय हे माहिती नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.
तसेच, जर आम्ही निवडुका एकत्र लढणार नव्हतो. तर अशा सरकारध्ये राहण्यात काही अर्थ नव्हता. पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात आघाडीची लय बिघडली. विलासराव हे सर्वोत्तम मुख्यमंत्री होते, अशीही टीका सुनील तटकरेंनी पृथ्वीराज चव्हाणांवर केली आहे.