सुनील तटकरे अजित पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष;  बैठकीत निर्णय

सुनील तटकरे अजित पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष; बैठकीत निर्णय

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता नवी माहिती समोर येत आहे. सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देवगिरीवर झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. थोड्याच वेळात अजित पवार या संदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे. अजित पवार हे अधिकृत पत्र काढून त्याबाबत घोषणा करतील, असं सांगण्यात येतंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com