राजकारण
माझा ब्रँड संजय राऊत माझ्यामागे असल्यामुळे मला देखील शंभर कोटींची ऑफर - सुनील राऊत
खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी एक वक्तव्य केलं आहे.
खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. सुनील राऊत म्हणाले की, संजय राऊत यांनी भाजपसमोर जर गुडघे टेकले असते. तर ते साडेचार महिने जेलमध्ये गेले नसते. साडेचार महिने माझ्या घरच्यांनी कसे काढले हे फक्त आम्हालाच माहिती आहे.
तसेच ते म्हणाले की, मी स्वतः आमदार आहे पण माझा ब्रँड संजय राऊत माझ्यामागे असल्यामुळे मला देखील शंभर कोटींची ऑफर आहे. कितीही ऑफर आल्या तरी आम्ही आमचा विचार बदलणार नाही. शंभर कोटी घेऊन माझ्यासारखा निष्ठावंत शिवसैनिक बदलणार नाही. मला याआधी शंभर कोटींची ऑफर होती आणि आज सुद्धा मला ऑफर आहे. असे सुनील राऊत म्हणाले.