पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालक पदासाठी सुनेत्रा आणि पार्थ पवार उमेदवारी अर्ज भरणार नाही

पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालक पदासाठी सुनेत्रा आणि पार्थ पवार उमेदवारी अर्ज भरणार नाही

पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालक पदासाठी सुनेत्रा आणि पार्थ पवार उमेदवारी अर्ज भरणार नाही.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

चंद्रशेखर भांगे, पुणे

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालकपदाची आज पोटनिवडणूक होत आहे. अजित पवारांनी संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही पोटनिवडणूक होणार आहे. जिल्हा बँकेच्या बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली असून पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक घोषित केली होती. अजित पवार देतील तोच उमेदवार असणार आहे. अशी बँकेच्या संचालक मंडळाची भूमिका आहे.

यातच आता पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालक पदासाठी सुनेत्रा आणि पार्थ पवार उमेदवारी अर्ज भरणार नाही. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानं संचालक पद रिक्त झाले होते. त्यांच्या जागेवर पार्थ किंवा सुनेत्रा पवार संचालक होणार असल्याची जोरदार चर्चा होती. बॅंकेचे संचालक होऊन जिल्ह्याच्या राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा होती. बारामती लोकसभा निवडणुकीसाठी ही तयारी असल्याचे बोलले जात होते. या सर्व राजकीय चर्चांना पुर्ण विराम मिळाला आहे. आज बॅंकेच्या संचालक पदासाठी निवडणुक होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com