सांस्कृतिक मंत्र्याकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; काय म्हणाले मुनगंटीवार?

सांस्कृतिक मंत्र्याकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; काय म्हणाले मुनगंटीवार?

राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
Published on

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलचे दोन दिवसीय निवासी शिबिराचे नागपूरात आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीत ओबीसींचा सन्मान होत नाही, असा आरोप राष्ट्रवादीने केला होता. याला उत्तर देताना भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला आहे. यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

सांस्कृतिक मंत्र्याकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; काय म्हणाले मुनगंटीवार?
ओडिशा रेल्वे दुर्घटनेवर गौतम अदानींची मोठी घोषणा; अनाथ मुलांना शिकवणार

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

हे लोक आम्हाला शिकवतायत ओबीसींबद्दल. काँग्रेसचा पंतप्रधान कोण आहे? तर एक ब्राह्मण आहे, जो जाणवं घालतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वर्षांपासून अध्यक्ष कोण आहे? मराठा शरद पवार, तो आम्हाला अक्कल शिकवणार का? जनतेलाही हे समजलं पाहिजे की, मायावी चेहरे घेऊन बसलेल्या या लोकांपासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे. हे लोक आपल्यासमोरचा मोठा धोका आहेत, असे शरसंधान सुधीर मुनगंटीवारांनी राष्ट्रवादीवर साधले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीच्या आधारावर पत्ते खेळत नाहीत. ओबीसींचं राजकारण करत नाहीत. आमचे राज्य अध्यक्ष ओबीसी आहेत. मग कुणाला डावलले जाते. यामुळे आम्ही ओबीसी नेत्यांना डावलतो हे साफ चुकीचे आहे. या खोटारड्या लोकांपासून जनतेनं लांब राहावं. खोट्या विचारांपासून ओबीसी बंधू आणि भगिनींनी लांब राहावं. खरंतर ओबीसी पंतप्रधान झाल्यामुळे यांच्या पोटात दुखतंय, अशीही टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, भास्कर जाधव यांनी विधानसभा निवडणूक भाजप शिंदे गटाशिवाय स्वबळावर लढणार असल्याचा दावा केला होता. यावरही मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्र आहोत. सर्व निवडणुका एकत्र लढणार आहोत. त्यामुळे आमच्यात काड्या घालायचे काम कुणी करू नये. भास्कर जाधवांना आग लावण्याशिवाय आणखी काय येत नाही, असा जोरदार टोला त्यांनी लगावला आहे. तसेच, आमची युती शिंदेंच्या शिवसेनेसोबत असून ती अंबुजा सिमेंटसारखी मजबूत आहे. सोनिया सेनेसोबत आम्ही कधीच जाणार नाही, असा निशाणाही मुनगंटीवारांनी ठाकरे गटावर साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com